दहा हजार दे, नाहीतर ग्रामपंचायतची बदनामी करणारी बातमी छापलं…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- अन्याय झाला तर त्याचा चेहरा उघड करत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकार होय.. मात्र आता याला काळिमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली आहे.

वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त एकाने ग्रामपंचातकडे पैशांची मागणी केली. पैसे नाही दिले तर ग्रामपंचायत कार्यालयाची बदनामी करणारी बातमी प्रकाशित करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी येथील जितेश मनोहरलाल लोकचंदानी

यांनी वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमित्त रुई ग्रामपंचायतचे सरपंच संदीप बाबासाहेब वाबळे यांना 8 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021 या दरम्यान फोन करुन

10 हजार रुपये रोख रकमेची खंडणी मागितली व पैसे नाही दिले तर ग्रामपंचायत कार्यालयाची बदनामी करणारी बातमी प्रकाशित करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी संदिप बाबासाहेब वाबळे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांचेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24