‘कोरोना चाचणी अहवाल एका दिवसात द्या, अन्यथा..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी सहा ते सात दिवस विलंब लागत असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने कोरोना चाचणीचे अहवाल एका दिवसांत देण्याची मागणी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन जिल्हा रुग्णालयातील डॉ. जमदाडे यांना देण्यात आले. यावेळी छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा सांगळे, गणेश गायकवाड, सचिन खंडागळे आदी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर त्याचा अहवाल येतो. तोपर्यंत स्वॅब देणारा सार्वजनिक ठिकाणी फिरत असतो.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा अहवाल एका दिवसात देण्याची मागणी छावा मराठा युवा संघटनेतर्फे करण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24