रुग्णांना तत्काळ इंजेक्शन द्या अन्यथा ते हिसकावून नेऊ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यातच कोरोना रुग्णाला वाचविण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन हे प्रभावी ठरत आहे.

यातच याचा काळाबाजार देखील सुरु झाला आहे. यामुळे अनेक रुग्ण या इंजेक्शन अभावी मृत्यूच्या दारात जात आहे. यातच श्रीगोंदामध्ये देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत राष्ट्रवादीच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली.

अनेक कोरोनाबाधित रुग्ण रेमडेसिविरअभावी जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत होते. प्रशासनाकडून मात्र उपलब्ध रेमडेसिविर वितरणाची परवानगी मिळत नव्हती.

अर्ध्या तासात रेमडेसिविर न दिल्यास ती ‘लुटून’ रुग्णांना देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शेलार यांनी दिला. त्यानंतर काही वेळातच रेमडेसिविर इंजेक्शन वितरणाचे आदेश निघाले.

यासंदर्भात प्रवीण शेलार म्हणाले, ६० रेमडेसिविर इंजक्शन शुक्रवारी रात्रीपासून येथील एका मेडिकलमध्ये उपलब्ध होते. औषध निरीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेले अधिकारी यांच्या परवानगीशिवाय त्याची विक्री करता येत नव्हती.

याबाबत प्रशासनाने मेडिकलला विक्रीबाबत सूचना दिल्या नव्हत्या. त्यामुळे औषध विक्रेता हे इंजेक्शन रुग्णांना देत नसल्याची बाब समोर आली. त्यावर अधिकाऱ्यांची संपर्क साधूनही इंजेक्शन वितरणाचे आदेश निघत नसल्याने

अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनास अर्धा तासाची मुदत दिली. या कालावधीत रेमडेसिविर विक्रीचा आदेश न आल्यास हे इंजेक्शन मेडिकलमधून

‘लुटून’ ते रुग्णालयात गरजूंना देण्याचा इशारा त्यांनी दिला.त्यानंतर अर्ध्या तासाच्या आत प्रशासनाने हालचाल करून इंजेक्शन विक्रीचा आदेश काढला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24