अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-कोव्हीड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून, रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा तातडीने व्हावा, कोव्हीड चाचण्यांचे अहवाल स्थानिक पातळीवरच मिळावेत म्हणून केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय पाहाणी पथकांकडे केली.
कोव्हीड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाने शिर्डी येथे पाहाणी करुन, कोव्हीड उपायोजनांचा आढावा घेतला.बैंगलोर येथील एनआयएचएम मधील डॉ.एन गिरीषराव, दिल्ली येथील येथील सप्तरजंग रुग्णालयातील डॉ.गुदीया यांच्या पथकाने कोव्हीड सेंटरला भेट देवून माहीती घेतली.
भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरातील प्रमुख पदाधिका-यांनी या शिष्टमंडळाची भेट घेवून प्रमुख मागण्या केल्या. प्रामुख्याने कोव्हीड रुग्णसंख्या वाढत असताना आवश्यक असलेल्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हा रुग्णालयाच्या समन्यवया अभावी इंजेक्शनच्या वितरण व्यवस्थेत होत असलेला गोंधळ खुप गंभिर आहे. ही बाब त्यांनी प्रामुख्याने केंद्रीय समितीच्या निदर्शनास आणून दिली.
उपलब्ध असलेला इंजेक्शनचा साठा नियोजनपुर्वक वितरीत होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आ.विखे पाटील यांनी या समितीशी चर्चा करताना विषद केली. कोव्हीड चाचण्यांचे अहवाल येण्यास बराच कालावधी लागतो.
यासाठी चाचण्यांचे हे अहवाल स्थानिक पातळीवरच मिळावे याकरीता शिर्डी शहरामध्ये चाचणी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी आ.विखे पाटील यांनी याप्रसंगी केली. या शिष्टमंडळात शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिषचंद्र कोते,
माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, मंगेश त्रिभूवन, नितीन कोते,अशोक गोंदकर, अशोक गायके, रवि गोंदकर, या शिष्टमंडळातील सर्व सदस्यांनीसुध्दा रेमडीसीवीर इंजेक्शनंच्या समस्या या केंद्रीय समितीच्या निदर्शनास आणून दिल्या.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संदिप सांगळे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी रविंद्र ठाकरे, तालुका आरोग्य आधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, तहसिलदार कुंदन हिरे,
मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आदि याप्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय समितीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटरला तसेच राहाता येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला.