अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे २३ जूनच्या राेजीच्या सुमारास नामदेव सुकदेव पोकळघट यांचे गट नंबर १८२ मध्ये शेतात राहत असून रात्री दोन वाजेच्या सुमारास त्याच्या वस्तीवर बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला.
या बिबट्याच्या हल्यामध्ये एक शेळी ठार झाली आहे. त्यामुळे धारणगाव शिवारात भीतीचे वातावरण पसरले. या हल्याची खबर मिळताच कोपरगाव वन विभागाचे वनरक्षक आर. एन. सांगळे,
वनपाल बी. एस. गाढे तसेच वन परिक्षत्रक अधिकारी कुमारी प्रतिभा सोनवणे यांनी घटना स्थळी भेट देऊन वन्य प्राण्याच्या पायांचे ठसे तपासले.
वनरंक्षक आर. एन. सांगळे यांनी मृत शेळीचा पंचनामा करून बाजारातील किंमत सहा हजार सांगून नामदेव सुकदेव पोकळघट यांना त्याच्या शेळीच्या मोबदला शासनाच्या नियमानुसार देणार आहोत.
या घटनेने कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.