अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरात शेळ्या व मेंढ्याचा खरेदी-विक्रीचा बाजार भरवून शासनाच्या फिजीकल डिस्टनसिंग तसेच मास्कचा वापर या आदेशाला हरताळ फासला गेल्याने प्रशासनाची कार्यपद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
राहुरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठवडे बाजार तसेच जनावरांची खरेदी-विक्री गेल्या महिन्याभरापासून बंद करण्यात आली.
शासनाच्या आदेशाचे पालन होण्यासाठी कामगार तलाठी, ग्रामसेवकावर अधिकाऱ्यांकडून कागदोपत्री जबाबदारी सोपवण्यात आली.
मात्र, कोल्हार खुर्द परिसरात चक्क शेळ्या-मेंढ्याचा बाजार भरवून शासनाच्या आदेशाला हरताळ फासला गेल्याने राहुरीत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला.