अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. यामुळे प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.
कोरोनामुळे सर्वत्र शुकशुकाट असल्याचा फायदा घेत चोरटे आपला डाव साधत आहे. नुकतेच कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराच्या सभा मंडपात असलेली दानपेटी फोडून दोन हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिरात दानपेटी बसविण्यात आलेली आहे.
सदर दानपेटीवर अज्ञात चोरट्यानी पाळत ठेऊन ती दानपेटी फोडून त्यातील रक्कम रोख दोन हजार रुपये चोरून नेली आहे.