गोकुळ शुगरचे चेअरमन शिंदे यांचा मृतदेह आढळला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन होते.

शिंदेंनी आत्महत्या केली, अपघात घडला की घातपात झाला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते.

उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुला खाली छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली.

संबंधित मृतदेह हा भगवान शिंदे यांचा असल्याची नातेवाईकांनी खात्री केली. भगवान शिंदे यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शिंदे यांनी आत्महत्या केली कि त्यांचा पुलावरुन पडून अपघाती मृत्यू झाला, का त्यांच्यासोबत काही घातपात घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24