महाराष्ट्रात सोने-चांदी झाले महाग; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- सोने – चांदी बाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे. सोन्या – चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आजच्या स्थितीला १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,४०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तर दुसरीकडे चांदी ६१,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

जाणून घ्या आजचे दर मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,४०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,५३० प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,३५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५०० रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,४०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५३० रुपये इतका असेल. दरम्यान उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.