अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- सोने, चांदीची खरेदी करायची असेल तर आताच सुवर्णसंधी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. गुंतवणुकदारांसाठी देखील ही चांगली वेळ आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांनी आताच खरेदी करावं.
जुलै महिन्याच्या शेवटी सोने-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत सोमवारी वाढून 47,380 रुपयांवर गेली. चांदी 67,900 रुपये प्रति किलो दराने विकली जात होती.
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे संपूर्ण भारतामध्ये सोन्याचे दागिने किंमत बदलत आहे. सोनं हे गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय समजलं जातं. म्हणजेच उच्चतम किमतीपेक्षा सोन तब्बल सात हजारांपेक्षा कमी दराने विकत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा कोणत्या दराने व्यापार होत आहे ते जाणून घ्या :- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यापार घसरणीसह सुरु होता. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार 3.50 डॉलर घसरणीसह 1,810.26 डॉलर प्रति औंस रेट वर ट्रेड होत आहे. दुसरीकडे, चांदी 0.03 डॉलरच्या घसरणीसह 25.48 डॉलरवर ट्रेड करत बंद झाला होता.
जाणून घ्या प्रमुख शहरांतील लेटेस्ट रेट :-
दिल्ली :- 22ct सोने: रु. 47140, 24ct सोने: रु. 51430, चांदी किंमत: रु. 67900
मुंबई :- 22ct सोने: रु. 47380, 24ct सोने: रु. 48380, चांदी किंमत: रु. 67900
नाशिक :- 22ct सोने: रु. 47390, 24ct सोने: रु. 48390, चांदी किंमत: रु. 67900
पुणे :- 22ct सोने: रु. 46600, 24ct सोने: रु. 49870, चांदी किंमत: रु. 67900
अहमदनगर :- 22 कॅरेट सोने: रु. 4,6180 , 24 कॅरेट सोने: रु.48,490 चांदी किंमत: रु. 73000