सोने १,६२१ रुपयांनी घसरले ! ही आहेत सोन्यातील घसरणीची चार मोठी कारणे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- सणासुदीत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी २४ कॅरेट सोने १,१३० रु. स्वस्त होऊन ४५,२०७ रु. प्रति १० ग्रॅमवर आले.

गुरुवारीही दिल्लीत सोने ४९१ रु. स्वस्त झाले होते. याच पद्धतीने दोन दिवसांत सोने १,६२१ रु. स्वस्त झाले. किमती घटल्याने दागिन्यांच्या किमती वाढतील, कारण सणात सोने खरेदी शुभ मानली जाते.

वास्तवात सोन्याला डॉलर बळकट होण्याचे परिणाम सोसावे लागत आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक तपन पटेल म्हणाले, अमेरिकेत रिटेल विक्रीच्या जोरदार आकड्यामुळे डॉलरला सपोर्ट मिळण्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसू शकतो.

५ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोने ४५,२५९ रु. व २२ कॅरेट सोने ४१,४५७ रु. प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होते. दागिन्यांचे सोने ४२,५०० पेक्षा खाली केवळ दिल्लीत स्वस्त झाले नाही तर पूर्ण देशाच्या सराफा बाजारात घसरणीचा कल दिसू शकतो.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार(आयबीजेए) शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,३१० रु. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ४२,४२० रु. होती. गेल्या दोन दिवसांत शुद्ध सोन्याची किंमत ९४५ रु. आणि दागिन्यांच्या सोन्याची किंमत ८६६ रु. घटली आहे.

पाटण्यात सोने सर्वात जास्त महाग शहर

२२ कॅरेट २४ कॅरेट

जयपूर 43,300 47,600

इंदूर 43,510 47,700

रायपूर 44,100 47,900

जळगाव 43,420 47,400

अहमदाबाद 47,400 48,000

चंदीगड 45,100 47,700

पाटणा 48,200 49,500

(सर्व भाव रु. प्रति १० ग्रॅम)

सोन्यातील घसरणीची चार मोठी कारणे

१ . मोठ्या देशांच्या केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी बंद केली. यामुळे पुरवठा अचानक वाढला आहे.

२. अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर परतल्याने डॉलरला बळ मिळाले आणि सोन्यावर दबाव वाढू लागला.

३. कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता घटल्याने हेजिंगसाठी सोन्याची मागणी कमकुवत झाली.

४. जगभरातील शेअर बाजारांत सलग तेजीचा कल राहिल्याने गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी घटली आहे.

Ahmednagarlive24 Office