अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ दिसून आली होती, मात्र आज दरामध्ये काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,760 रुपयांवरून घसरून 47,730 रुपये प्रति ग्रॅम झाले.
त्याचबरोबर आज चांदीचा भाव 71,900 रुपये प्रतिकिलो होता. दरम्यान देशातील कोरोनाची परिस्थिती आता हळूहळू सुधारू लागल्याने गुंतवणूकदारांनी सोन्या ऐवजी आता शेअर मार्केटकडे आपला मोर्चा वळवला आहे.
यातच सध्या मार्केटमध्ये चांगला नफा मिळत असल्याने गुंतवणूकदारांकडून शेअर बाजरातील गुंतवणुकीत वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेत सोन्या-चांदीचे भाव आज भारतीय बाजारामध्ये कमकुवत राहिले.
MCX वर तिसर्या दिवशी सोन्याचे दर घसरून 48493 रुपयांवर आले, तर चांदी 0.8% घसरून 71301 रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात सोन्याचे दर 0.8 टक्क्यांनी तर चांदी 0.56 टक्क्यांनी घसरली होती.
या महिन्याच्या सुरूवातीला 5 महिन्यांच्या उच्चांकी पातळी 49,700 चा उच्चांक गाठल्यानंतर सोने नफा कायम राखण्यात अपयशी ठरले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीला स्पर्श केला होता.
या दृष्टीने विक्रमी पातळीवरुन सोने अजूनही आठ हजार रुपयांनी स्वस्त दर मिळत सोने खरेदीसाठी आजपासून हॉलमार्किंग अनिवार्य येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे.
कारण, आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरंतर या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार होती.
मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ही मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली. त्यानुसार आजपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होईल.