Gold Price: गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या (gold and silver) दरात मोठी अस्थिरता होती. भारतात सोन्याची खरेदी शुभ मानली जाते आणि लग्नाच्या हंगामात (wedding season) त्याची मागणी लक्षणीय वाढते.
मात्र, भारत इतर देशांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात करतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या डेटाच्या आधारे, जाणून घ्या या आठवड्यात सोन्याचे दर काय होते.
24 कॅरेट सोन्याच्या भावात असे चढउतार दिसून आले
IBJA नुसार, 1 ऑगस्ट 2022 रोजी, 999 दर्जाच्या सोन्याची किंमत 51,668 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. बिझनेस वीकच्या दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच 2 ऑगस्ट 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 119 रुपयांनी घसरून 51,549 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
त्याच वेळी, 3 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 17 रुपयांनी वाढून 51,566 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुरुवारी, 4 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली. 4 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 473 रुपयांनी वाढून 52,039 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
बिझनेस वीकच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच 5 ऑगस्ट 2022 रोजी सोन्याचा दर 20 रुपयांनी घसरून 52,019 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. अशाप्रकारे गेल्या आठवडाभरात 24 कॅरेट सोन्याच्या दरात एकूण 351 रुपयांची वाढ झाली आहे.
स्पॉट मार्केटमध्ये चांदीचा भाव
1 ऑगस्ट 2022 रोजी स्पॉट मार्केटमध्ये चांदीची किंमत 58,379 रुपये प्रति किलो होती. मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी तो 475 रुपयांनी घसरून 57,904 रुपये प्रतिकिलो झाला. त्याच वेळी, 3 ऑगस्ट (बुधवार) रोजी चांदीचा भाव 748 रुपयांनी वाढून 58,057 रुपये प्रति किलोवर पोहोचला.
तथापि, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी तो 695 रुपयांनी घसरून 57,362 रुपये प्रति किलोवर आला. अशाप्रकारे, गेल्या एका व्यावसायिक आठवड्यात चांदीच्या दरात 1,017 रुपयांची घसरण झाली.