Gold Price Today : खुशखबर! पुन्हा घसरल्या सोन्याच्या किमती, खरेदीपूर्वी फक्त एकाच क्लिकवर जाणून घ्या नवीनतम दर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. फक्त सोनेच नाही तर चांदीच्या किमतीही घसरल्या आहेत.

अशातच आज नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू होत आहे. व्यावसायिक सप्ताहाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण होणार की दरवाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान जाणून घ्या आजचे नवीनतम दर.

आज जाहीर होतील नवीन दर

खरं तर, आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताहाला सुरुवात होत आहे. आज नवीन व्यावसायिक आठवड्याचा पहिला दिवस असून मागील व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला, सराफा बाजारात सोने तसेच चांदीच्या किमतीत कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे आज व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीची वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या सोडून इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन हे शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. तर शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने सराफा बाजार बंद होता. त्यामुळे आज सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर नवीन दर आज जाहीर करण्यात येणार आहेत.

शुक्रवारी हे होते दर

या व्यापार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी, सोने प्रति 10 ग्रॅम 425 रुपयांनी स्वस्त होऊन 60191 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 695 रुपये प्रति 10 ग्रॅमने महाग होऊन 60616 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला.

तसेच या दिवशी सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली. चांदीचा भाव 646 रुपयांनी घसरून 74773 रुपये प्रति किलोवर बंद झाला तर गुरुवारी चांदीचा भाव 1644 रुपयांच्या वाढीसह 75419 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

24 कॅरेट सोने 425 रुपयांनी स्वस्त होऊन 60191 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 423 रुपयांनी स्वस्त होऊन 59950 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 389 रुपयांनी स्वस्त होऊन 55135 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 319 रुपयांनी स्वस्त होऊन 45143 रुपये झाले. तसेच 14 कॅरेट सोने 248 स्वस्त होऊन 35212 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार होत आहे. MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे दर करमुक्त आहेत, त्यामुळे देशातील बाजारातील दरांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे.

सोने- चांदी पुन्हा स्वस्त

सोन्याची विक्री आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 689 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत असून 5 एप्रिल 2023 रोजी सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव 60781 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तर चांदी अजूनही 5207 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्तात विक्री होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.