ताज्या बातम्या

Gold Price Today : सोने महाग झाले कि स्वस्त ? पहा इथे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  बहुतांश वेळा सोनेखरेदीकडे एक गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. यामुळे सोन्याचे भाव हा एक प्रकारे गुंतवणुकदारसाठी एक जिव्हाळ्याचा विषयच आहे.

आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे 90 रुपयांची वाढ झाली आहे.गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 49000 रुपयांच्या वर पोहोचला होता.सोन्याप्रमाणे आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

रोजी सोने-चांदीचे दर

सोन्याचे भाव वाढले.24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 88 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 49351 रुपयांवरून 49439 रुपयांवर आला आहे.

गेल्या वर्षीच्या 56200 रुपयांच्या विक्रमी पातळीपेक्षा ते अजूनही स्वस्त आहे. चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर, ते प्रतिकिलो 288 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

चांदीचा भाव किलोमागे 66967 रुपयांवरून 66679 रुपयांवर आला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, काल संध्याकाळच्या दराच्या तुलनेत आज सकाळी 23 कॅरेट सोने 88 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे

आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 80 रुपये महागला आहे. याशिवाय 18 कॅरेट सोन्याचा भावही 66 रुपयांनी महागला आणि तो 37079 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. 14 कॅरेट सोन्याचा भाव 52 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढून 28922 रुपये झाला.

Ahmednagarlive24 Office