ताज्या बातम्या

Gold Price Update : सोने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! पुन्हा घसरले सोन्याचे दर, जाणून नवीन किमती

Gold Price Update : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करायला जाणार असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप कामाची आहे. काल व्यावसायिक आठवड्याचा पहिला दिवस होता. मागील व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने महाग झाले होते.

त्यामुळे काल पुन्हा सोन्याच्या किमतीत वाढ होणार की सोन्याच्या किमती कमी होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष होते. परंतु, काल सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. सोन्याची 59715 प्रति 10 ग्रॅम तर चांदी 71700 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

सोमवारी सोने प्रति 10 ग्रॅम 36 रुपयांनी स्वस्त झाले असून 59715 रुपये प्रति किलोवर बंद झाले. शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 416 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने वाढून तो 59751 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला.

सोमवारी सोन्यासोबत चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. चांदीचा भाव 118 रुपयांच्या वाढीसह 71700 रुपये प्रति किलोवर बंद झाला. शुक्रवारी चांदी 1582 रुपयांच्या उसळीसह 71582 रुपये प्रति किलोवर बंद झाली आहे.

जाणून घ्या नवीनतम दर

24 कॅरेट सोने 36 रुपयांनी स्वस्त झाले असून 59715 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 415 रुपयांनी स्वस्त झाले असून 59476 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 381 रुपयांनी स्वस्त झाले असून 54699 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 312 रुपयांनी स्वस्त झाले असून 44786 रुपयांवर आणि 14 कॅरेट सोने 312 रुपयांनी स्वस्त झाले असून 34933 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे दर करमुक्त झाले आहेत, त्यामुळे देशातील बाजारातील दरांमध्ये तफावत आढळून येते.

सोने 100 रुपयांनी महाग, तर चांदी 8200 रुपयांनी स्वस्त

यानंतर सोन्याचा दर 118 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमने महाग झाले आहे. यापूर्वी म्हणजे 31 मार्च 2022 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव 59751 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला. तर चांदी अजूनही 8398 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्तात खरेदी करता येत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो इतका आहे.

सोने सर्वात शुद्ध सोने

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जात असून मात्र या सोन्यापासून दागिने बनत नाहीत कारण ते खूप मऊ असते. दागिने बनवण्यासाठी अनेकजण 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने बनवण्यात येतात, तर 24 कॅरेट सोने चमकदार असते, मात्र त्याचे दागिने बनत नाहीत. त्यामुळे अनेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोन्याची विक्री करतात.

हॉलमार्क पाहून करा खरेदी

सोने खरेदी करत असताना ग्राहकांनी त्याच्या गुणवत्तेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हॉलमार्क पाहूनच सोन्याचे दागिने खरेदी करा. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी असून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी आहे जी हॉलमार्क ठरवत असते. हॉलमार्किंग योजना भारतीय मानक ब्युरो अंतर्गत नियम आणि विनियमांद्वारे नियंत्रित करण्यात येते.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क्स देण्यात येतात, 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असते.

जाणून घ्या फरक ?

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार करण्यात येतात. 24K सोने आलिशान असले तरी ते दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोन्याची विक्री करतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts