ताज्या बातम्या

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या (gold) किंमतीत घसरण नोंदवण्या आली.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांनी घसरला. तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत.

या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची (gold rate) किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे.

तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

 भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम         22 कॅरेट   (भाव रुपयांत)
1 ग्रॅम     4,550
8 ग्रॅम     36,400
10 ग्रॅम     4,5500
100 ग्रॅम   4,55000

 भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम         24 कॅरेट   (भाव रुपयांत)
1 ग्रॅम       4,964
8 ग्रॅम      39,712
10 ग्रॅम     4,9640
100 ग्रॅम   4,96400

 प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

शहर      22 कॅरेट       24 कॅरेट
मुंबई     45,290      46,290
पुणे      44,480      47,620
नाशिक    44,480    47,620
अहमदनगर  44530   4,6760

 

Ahmednagarlive24 Office