सोन्याच्या दरात झाली घसरण ! जाणून घ्या सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- शनिवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या दरात 342 रुपयांची घसरण होऊन प्रतितोळा भाव 48058 रुपये इतका झाला आहे. गेल्या आठवड्यात, ऑगस्ट महिन्यातील वितरणासाठी सोन्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 47923 रुपये होता. तर साप्ताहिक आधारावर यात 135 रुपयांची वाढ नोंदवली गेली.

जागतिक बाजारपेठेतील मौल्यवान धातूंच्या घसरणीत शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 73 रुपयांनी घसरून 47,319 रुपयांवर आला. तसेच चांदीही 196 रुपयांनी घसरून 68,043 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 48273 रुपये इतका झाला आहे. तर चांदीची किंमत प्रति किलो 68912 रुपये होती.

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर 16.40 डॉलरने (-0.90%) घसरण झाली असून ते प्रति औंस 1,812.60 इतका झाला आहे.

देशांतर्गत बाजारात चांदीच्या किंमतीत फार परिणाम झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये चांदीच्या भावात 1336 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीची किंमत 68345 प्रतिकिलो झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24