अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूकदार सोने खरेदीला पसंती देतात. कोरोनाच्या काळात तर सोने खरेदी ही उत्तम गुंतवणूक मानली गेली. सोन्याच्या भावात नित्यनियमाने चढउतार झालेले पाहायला मिळतात.
दरम्यान, सोन्यावर विविध टॅक्स लागत असतात. सोने खरेदी करताना आणि विक्री करताना देखील विविध स्वरुपाचे टॅक्स लागत असतात. भारताचा विचार केला तर भारतीयांना सोन्याची प्रचंड हौस. लग्न असो की, सण असो सोने खरेदी केलेच जाते. परंतु अलीकडील काळामध्ये पाहिलं तर सोन्याचे दर प्रचंड वाढले अन नंतर ते कमी होत गेले.
यात चढ उतार सुरु आहेत. आठवड्याच्या चढ-उतारानंतर देशात सोने तसेच चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ऑक्टोबर डिलिव्हरीसाठीचे सोने 952 रुपयांच्या घसरणीसह 46651 रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले.
तर डिसेंबर डिलिव्हरीसाठी असलेले सोने 998 रुपयांच्या घसरणीसह 46810 रुपये तसेच फेब्रुवारी 2022 डिलिव्हरीसाठीचे सोने 714 रुपयांच्या तेजीसह 48740 रुपये प्रति दहा ग्रॅम रुपयांवर स्थिरावले.
चांदीच्या दराची काय स्थिती ? या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीच्या दरामध्येसुद्धा मोठी घसरण पाहायला मिळाली. सप्टेंबर डिलिव्हरीसाठीच्या चांदीमध्ये 2023 रुपयांची घसरण झाली.
तसेच 2023 रुपयांच्या घसरणीसह सप्टेंबर डिलिव्हरीच्या चांदीचा दर 64,975 रुपये प्रति किलोवर स्थिरावला. मागील आठवड्यातील चांदीचा दर 67847 रुपये होता.
मागील आठवडा आणि सध्याचा आठवडा यांची तुलना केली तर या आठवड्यात चांदीच्या भावात 2872 रुपयांची घसरण झाली. डिसेंबर डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव 65800 रुपये प्रति किलोवर स्थिरावला. यामध्ये एकूण 2054 रुपयांची घसरण झाली.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता :-आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care app’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये जर सामानाचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळला तर ग्राहक त्याबद्दल लगेच तक्रार करू शकतो. या अॅपद्वारे (गोल्ड), ग्राहकाला तक्रार नोंदवण्याची माहितीही लगेच मिळेल.