अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ नोंदविण्यात आली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार सोन्याचे दर गुरुवारी 250 रुपयांनी वाढून 46,277 रुपये झाले.
आधीच्या व्यापारी सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 46,027 रुपये होता. त्याचप्रमाणे चांदी 258 रुपयांनी वाढून 66,842 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापारात चांदीची किंमत 66,584 रुपये प्रति किलो होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात मजबुतीमुळे आज भारतीय सराफा बाजारात सोने-चांदी महाग झाली. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आता आठवड्याच्या सुरूवातीला पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत.
आज सोमवारी (21 जून) मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर 0.40 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली वर चांदीचा दर 0.16 टक्क्यांनी घसरला. मागील आठवडयामध्ये गुरूवारी, शुक्रवारी सोन्याचा दर अंदाजे 1600 रूपयांनी कमी झाले होते.
दरम्यान जून महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचा दरात 2500 रूपयांची घट नोंदवण्यात आली आहे. भारतामध्ये सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा देखील परिणाम होत असतो. मागील महिन्यात गोल्ड ईटीएस मध्ये गुंतवणूक कमी झाल्याचं पहायला मिळालं आहे.
गोल्ड ईटीएस मध्ये गुंतवणूक 57% कमी झाली आहे. ही गुंतवणूक 288 कोटी इतकी कमी झाली आहे. आज रिटेल सेलिंग दरांनुसार, फाईन गोल्डचा दर 4702 प्रति ग्राम आहे. तर 22 कॅरेट 4542 प्रति ग्राम आहे. चांदीचा दर प्रतिकिलो 67,635 रूपये इतका आहे.