भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ , जाणून घ्या आजचे भाव !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- भारतीय बाजरातील सोने व्यापारावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसात सोन्याचे भाव अत्यंत कमी झाले होते. पंरतु आता परिस्थिती पूर्व पदावर येत आहे.

जागतिक बाजारात सोन्याचे भाव वधारल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजापेठेवरही झाला आहे. भारतीय बाजारातही सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

दिल्ली सराफीत सोन्याचा दर २३७ रुपयांनी वाढून ४७ हजार ९९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर १५३ रुपयांनी वाढून ७१ हजार ४२१ रुपये प्रति किलो झाला.

जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून १,८७४ डॉलर तर चांदीचा दर वाढून २७.८० डॉलर प्रति औंस झाला. यासंदर्भात एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की,

विविध देशांमध्ये करोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती लवचिक आहे. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्याचा आधार घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24