Gold Rate History : काय! एकेकाळी फक्त 111 रुपयांना मिळणाऱ्या सोन्यानं आज केलाय 63 हजारांचा टप्पा पार, कसं वाढलं दर जाणून घ्या
Gold Rate History : सध्याच्या काळात घेणं सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडत नाही. असे असूनही प्रत्येक दिवसाला त्याचे दर गगनाला भिडत आहेत. सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63 हजारांच्या वर आहे. याबाबत सोन्याच्या दराचे जाणकार असे सांगत आहेत की, येणाऱ्या काळात सोने खरेदी करणे अजून महाग होणार आहे.
परंतु आज ज्या सोन्याने 63 हजारांचा टप्पा पार केला आहे तेच सोने एकेकाळी फक्त 111 रुपयांना मिळत होते. इतक्या वर्षात सोन्याने इतका दर कसा गाठला असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या. सोन्याला संकटाचा साथीदार असे म्हटले जाते.
ज्यावेळी आर्थिक संकट येते त्यावेळी जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी करतात. दरम्यान एक काळ असा होता ज्यावेळी देशात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 111 रुपये इतकी होती. परंतु आज सोन्याने 60 हजार रुपयांचा आकडा पार केला आहे.
63 वर्षात असे वाढले दर
1960 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 111 रुपये होती आणि दशकानंतर सोन्याच्या दरात तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे.
वर्ष | वजन | किंमत |
1960 | 10 ग्रॅम | 111 |
1970 | 10 ग्रॅम | 184 |
1980 | 10 ग्रॅम | 1330 |
1990 | 10 ग्रॅम | 3200 |
2000 | 10 ग्रॅम | 4400 |
2005 | 10 ग्रॅम | 7000 |
2010 | 10 ग्रॅम | 18500 |
2015 | 10 ग्रॅम | 26343 |
2020 | 10 ग्रॅम | 48615 |
2022 | 10 ग्रॅम | 59300 |
2023 | 10 ग्रॅम | 63185 |
या कारणांमुळे वाढले दर
बाजारातील तज्ज्ञांचे असे मत आहे की, सध्या सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे अमेरिका आणि इतर देशांमध्ये बँकिंग संकट, कमकुवत डॉलर, सुरक्षित आश्रयस्थानाची मागणी तसेच शेअर बाजारात अनिश्चितता अशी परिस्थिती पसरली आहे. दरम्यान जागतिक शेअर बाजारामध्ये चढ-उतार सुरूच आहेत. चलनातील कमजोरीमुळे मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी वाढवण्यात आली आहे. इतकेच नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाही सध्या तेच करत आहे.
जगाच्या अनेक भागांत भू-राजकीय तणाव कायम असून ज्यावेळी बँकिंग संकट आले तेव्हा सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याला आधार मिळाला आहे. सध्या परिस्थिती अशीच असून आता बँकांच्या थकबाकीमुळे संपूर्ण बाजारात घसरण होण्याची भीती वर्तवली जात आहे. बँकिंग संकटाने जगभरातील बाजारपेठा हादरल्या असल्याने आता सोन्याच्या दरात कमालीची वाढ नोंदवण्यात आली आहे.
स्वातंत्र्यापूर्वी सोन्याचे दर
माहितीनुसार सन 1947, म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हा 10 ग्रॅम सोन्याची किंमत 88.62 रुपये इतकी होती. त्यानंतर सोन्याचे भाव झपाट्याने वाढले.
IBJA दरांनुसार, शुक्रवारी, 19 मे रोजी सोन्याचा भाव 60,302 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला असून या आठवड्यात सोन्याचे भाव खाली आले आहेत. मागील आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 61,037 रुपयांवर बंद झाले होते. त्यानुसार आठवडाभरात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 735 रुपयांनी स्वस्त झाला आहे.