अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली.राजधानीत सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 35 रुपयांनी वाढले. यामुळे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर 45,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.
मागील सत्रात दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,075 रुपये होता. जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात ही तेजी दिसून आली.
सणासुदीला सोन्याचे दर वाढणार ?
ऐन सणासुदीला सोन्याचे दर वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्यावर्षी सोन्याने 56 हजार रुपयांपेक्षा जास्त दर गाठला होता. तर कोव्हिड काळात अनेकजण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे वळलेल्याचं पाहायला मिळत आहे.
आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही वाढ कमीच असल्याची चर्चा आहे. सराफ बाजारात सोन्याचे दर घसरल्याने नागरिकांची सोनं-चांदी खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये आज 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 4, 528 रुपये आहे. तर 8 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 36 हजार 224 रुपये मोजावे लागणार आहेत.
10 ग्रॅमसाठी 45280 रुपये मोजावे लागणार आहेत. कालच्या तुलनेत आज सोनं साधारण 150 रुपयांनी वाढलं आहे.
जागतिक बाजारात सोन्याची किंमत :-
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत 1,755 डॉलर प्रति औंस होती. त्याचप्रमाणे चांदी 22.60 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली.एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, “चीनमधील एव्हरग्रँड संकटामुळे सोमवारी सोन्याचे भाव वाढले.”
गेल्या ४ दिवसांतील सोन्याचे दर
27 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,640
26 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,480
25 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,480
24 सप्टेंबर : 24 कॅरेट सोन्याचे दर- 49,480