Gold Rate update : सोने- चांदी ग्राहकांना मोठा झटका ! नववर्षापूर्वीच दरात झाली मोठी वाढ; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव

Gold Rate update : जर तुम्ही नववर्षाच्या आधी दागदागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोड थांबा. कारण सोने- चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 54,476 रुपयांवर आला आहे. आज तो 110 रुपयांनी वधारला. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 116 रुपयांनी कमी होऊन 67,706 रुपयांवर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आज सोन्या-चांदीत तेजी

गेल्या शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 54,476 रुपयांवर बंद झाला होता आणि आज सोन्याचा दर 54,476 रुपयांवर आला आहे. सोने 100 रुपयांनी वाढले आहे.

सोन्याचा सर्वोच्च दर आतापर्यंत 56,600 रुपये होता आणि तो सध्या त्याच्या शिखरापेक्षा 2,100 रुपयांनी मागे आहे. त्याच वेळी 22 कॅरेट सोने, ज्यामध्ये सर्वाधिक दागिने बनवले जातात, ते 101 रुपयांनी महागून 49,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत.

IBJA वर आज 26 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीचे दर

IBJA च्या वेबसाइटवर दिलेले सोने आणि चांदीचे दर खालील तक्त्यामध्ये दिले आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम ते 14 कॅरेट सोन्याचा दर तक्त्यामध्ये दिला आहे. यासोबतच एक किलो चांदीचा दर देण्यात आला आहे. आजच्या सोन्या-चांदीच्या दराची शुक्रवारच्या बंद किंमतीशी तुलना केली गेली आहे. असा आहे सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा भाव…

26 डिसेंबर रोजी धातूचा दर (रु/10 ग्रॅम) 23 डिसेंबरचा दर (रु/10 ग्रॅम) दरात बदल (रु/10 ग्रॅम)

सोने 999 (24 कॅरेट) 54476 54366 110
सोने 995 (23 कॅरेट) 54258 54148 110
सोने 916 (22 कॅरेट) 49900 49799 101
सोने 750 (18 कॅरेट) 40857 40775 82
सोने 585 (14कॅरेट) 31859 31804 65
चांदी 999 67706 रु/किलो 67822 रु/किलो -116 रु/किलो

MCX वर सोने आणि चांदीचे दर

सोमवारी इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) प्रमाणे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज, सोने वाढीसह आणि चांदी घसरणीसह व्यवहार करत होते. एमसीएक्सवर सोने 150 रुपयांनी महागून 54,724 रुपयांवर आहे, तर चांदी 3 रुपयांच्या किंचित घसरणीसह 69,030 रुपयांवर व्यवहार करत आहे.