अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली. दिल्ली सराफात सोन्याचे दर 661 रुपयांनी कमी होऊन 46,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
तर चांदीचे दर 347 रुपयांनी कमी होऊन 67,894 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,815 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26.96 डॉलर प्रति औंस झाले.
महाराष्ट्रात सोने आणि चांदीच्या भावात घट झाली आहे. राज्यात 24 कॅरेट सोन्याच्या भावात 460 रुपये प्रति 10 ग्रॅमने घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 47,440 रुपये झाला.
गेल्या सत्रात हा दर 47,900 रुपये इतका होता. तर 2 कॅरेट सोन्याचा भाव 46,440 रुपये प्रति झाला आहे. गेल्या सत्रात हा दर 46,900 रुपये इतका होता.
तर यासोबतच चांदीच्या भावात 250 रुपये प्रति किलोग्रॅमने घट झाली आहे. त्यामुळे काल 68,950 रुपये प्रति किलोग्रॅम असणारी चांदीची किंमत 68,700 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.
जागतिक व्यापार वाढू लागल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक इतर व्यवसायाकडे वळू लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तरीही यावर्षी सोन्याचे दर वाढतील मात्र ते गेल्यावर्षी इतके वाढणार नाहीत असे बऱ्याच विश्लेषकांनी सांगितले आहे.