ताज्या बातम्या

Kawasaki Ninja 300 : खरेदीची सुवर्णसंधी! कावासाकीच्या ‘या’ बाईकवर मिळत आहे भरघोस सूट, आजच घरी आणा

Published by
Ahmednagarlive24 Office

Kawasaki Ninja 300 : कावासाकी सतत आपल्या नवनवीन बाईक्स मार्केटमध्ये आणत असते. काही महिन्यांपूर्वी कंपनीने Kawasaki Ninja 300 ही बाईक लाँच केली होती. कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाईक आहे.

त्याशिवाय या बाईकला Baby Ninja असेही म्हटले जाते. कंपनीने या बाईकला शानदार लूक आणि दमदार फीचर्स दिली आहेत. आता या बाईकवर 10,000 रुपयांची भरघोस सूट मिळत आहे.

जाणून घ्या ऑफर

कावासाकी इंडियाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की कंपनी निन्जा 300 मोटरसायकलवर 10,000 रुपयांचे फायदे मिळणार आहे. मात्र ही ऑफर फाक्त 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत वैध आहे. त्यामुळे आजच स्वस्तात ही बाईक घरी आणा.

इंजिन आणि गिअरबॉक्स

या बाईकमध्ये 296cc पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक, इंधन-इंजेक्टेड इंजिन असून ते 11,000 RPM वर 38.4 bhp ची पॉवर आणि 10,000 RPM वर 26.1 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच ते 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्याला असिस्ट आणि स्लिपर क्लचही कंपनीने दिला आहे.

फीचर्स

फीचर्सबाबत बोलायचे झाले तर ही बाईक 37 मिमी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्सवर चालते आणि 5-वे प्रीलोड अ‍ॅडजस्टॅबिलिटीसह मागील बाजूस गॅस-चार्ज केलेले मोनो-शॉक शोषक आहे. तर ब्रेकिंगसाठी, मोटरसायकलला ड्युअल चॅनल एबीएससह दोन्ही चाकांवर पेटल डिस्क ब्रेक आहेत. तसेच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.

Ahmednagarlive24 Office