Post Office : अनेकजण जास्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणुकीत करत आहेत. अशा काही सरकारी योजना आहे ज्यात इतर योजनेपेक्षा फायदा होत आहे तसेच परतावा शानदार मिळत आहे. यापैकी सरकारची एक योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक पोस्ट ऑफिस योजना.
या योजनेत आता गुंतवणूकदारांना 8 टक्के व्याज मिळत आहे. अनेकांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे त्याचा लाभ घेता येत नाही. इतकेच नाही तर या योजनेत कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. काय आहे सरकारची ही योजना जाणून घ्या सविस्तरपणे.
पोस्ट ऑफिस योजना
इंडिया पोस्ट ऑफिस विशेषत: आता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी विविध योजना ऑफर करत आहे. यापैकी एक लोकप्रिय योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना होय.
जाणून घ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस योजनेबद्दल
पोस्टाची ही 5 वर्षांच्या कालावधीची बचत योजना असून जी वार्षिक 8 टक्के व्याज दर देत आहे. यात किमान गुंतवणुकीची रक्कम रु. 1,000 आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा रु. 15 लाख इतकी आहे. हे लक्षात घ्या की ही केवळ 60 वर्षांवरील गुंतवणूकदारांसाठी आहे. सरकार दर तिमाहीत लहान बचतींवरील व्याजदरांचा आढावा घेते.
मिळतो शानदार व्याजदर
मागील दर सुधारणेमध्ये, सरकारने वित्तीय वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी व्याजदर वार्षिक 8 टक्के केला. 31 मार्च 2023 पर्यंत योजनेची कमाल मर्यादा 15 लाख रुपये इतकी आहे. तर या खात्याचा 5 वर्षांचा कालावधी आणखी 3 वर्षांसाठी वाढवला जातो.
मिळत आहे कर लाभ
व्याज दर तिमाहीत चक्रवाढ करून परिपक्वतेच्या वेळी मूळ रकमेसह देय असतो. व्याज प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी देण्यात येते. तसेच, SCSS मध्ये कर लाभ मिळत आहे. भारतीय कर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या आयकर सवलतीचा लाभ घेता येत आहे.