Redmi Note 11 Series : सुवर्णसंधी! Redmi Note 11 सीरिज आता कमी किमतीत खरेदी करता येणार, जाणून घ्या ऑफर

Redmi Note 11 Series : काही दिवसांपूर्वीच रेडमीने Redmi Note 11 सीरिज लाँच केली होती. या सीरिजमधल्या स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरु होत आहे.

परंतु, तुम्हाला आता हे स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. त्यामुळे स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे ही संधी गमावू नका.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

इतकी मिळत आहे सवलत

या सीरिजच्या स्मार्टफोनच्या किंमतीत एकूण 1,000 रुपयांपर्यंत कपात केली आहे, या कपातीमुळे Redmi Note 11 Pro Plus ची किंमत 19,999 रुपयांपासून, तर Redmi Note 11S ची किंमत 15,999 रुपयांपासून सुरू होत आहे आणि Redmi Note 11 ची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होत आहे.

Redmi Note 11 Pro ची किंमत

6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा Redmi Note 11 Pro Plus हा स्मार्टफोन सवलतीमुळे 20,999 रुपयांऐवजी 19,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन 22,999 रुपयांऐवजी 20,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन 24,999 रुपयांऐवजी 22,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Redmi Note 11S ची किंमत

6GB RAM आणि 64GB स्टोरेज असणारा हा स्मार्टफोन सवलतीमुळे 16,499 रुपयांवरून 15,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा हा स्मार्टफोन18,499 रुपयांऐवजी 16,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Redmi Note 11 Pro ची किंमत

हे लक्षात घ्या की,भारतात Redmi Note 11 Pro च्या किमतीत कोणताही बदल केला नाही. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन 17,999 रुपयांना असणार आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तुम्ही Amazon किंवा Flipkart वरून फोन खरेदी करून सवलतीचा लाभ घेऊ शकता.