अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- देशांतर्गत बाजारात आज सलग आठव्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत.
गुंतवणुकीसाठीही हा एक चांगला काळ आहे, कारण सोन्याच्या ५६२५४ च्या सर्वोच्च काळापासून ११५०० रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाला आहे.
सोन्याचे दर प्रतितोळा ४४ हजार ४०० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) वरील सोन्याचे वायदा ०.३% घसरून ते ४४,४०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचे वायदे ०.६ टक्क्यांनी घसरून ६५,५२३ रुपये प्रति किलो झाले.
मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर कित्येक महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत ४४,५८९ वर बंद झाली.
दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी चांदीच्या किंमतीत घट दिसली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मे २०२१ च्या वायदा चांदीची किंमत ५७५ रुपये म्हणजे ०.८७ टक्क्यांनी घसरून ६५,५२३ रुपये प्रति किलो झाली.
दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ३६८ रुपयांची घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर गेल्या ९ महिन्यातील निच्चांकी स्तरावर आहेत. स्पॉट गोल्ड ०.२% ने कमी होत १,६९३.७९ डॉलर प्रति औंस आहेत.
दिल्लीतील सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत ६५,५२३ रुपये आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर ०.२% ने वाढून २५.३५ डॉलर प्रति औंस झाले आहेत.