अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बाजरात सर्वकाही पूर्वपदावर येताना दिसून येत आहे. यामुळे खरेदी विक्रीमध्ये देखील वाढ झाली आहे.
यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यातच आता तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच खरेदी करा कारण सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
आपण सोनं घेण्याचा विचार करीत आहात तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण होतं आहे. गुरुवारी 1 हजार 200 रुपयांची घसरण झाल्यानंतर, शुक्रवारी सकाळी सराफ बाजाराला सुरुवात होताच सोन्याचे दर पुन्हा दीडशे रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळाले.
जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सकाळी सोने दहा ग्रॅम म्हणजेच प्रति तोळ्याचे दर 47 हजार 800 इतके नोंदवले गेले. तर चांदीच्या दरात देखील तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 70 हजार प्रति किलो होता.
मागील वर्षी, कोरोनाच्या संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, ऑगस्ट 2020 मध्ये, MCXवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली होती.
जागतिक घडामोडीचा हा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. डॉलरचे मूल्य घसल्याचा हा परिणाम दिसून येत आहे. सोन्याच्या भावात घसरण झाल्याने सोने खरेदीसाठी ग्राहकांची पसंती मिळत आहे. यामुळे सुवर्ण बाजारात चैत्यन्य निर्माण झाले आहे.