PM Kisan Yojna : गुडन्यूज! ‘या’ महिन्यात मिळणार 13व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan Yojna : सरकारकडून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजनांचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. शेतकऱ्यांच्या खात्यात गेल्या महिन्यात 12 व्या हप्त्याचे पैसे जमा झाले होते.

मात्र काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशातच आता शेतकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 13व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. पंतप्रधान मोदी स्वतः या योजनेवर लक्ष ठेवून आहेत त्याशिवाय त्यांनी या योजनेचे अनेकदा कौतुक केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाकांक्षी योजना

काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी या योजनेबाबत एक ट्विट केले आहे की,” देशाला आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा अभिमान आहे. ते जितके बलवान असतील तितका समृद्ध न्यू इंडिया असेल. मला आनंद आहे की पीएम किसान सन्मान निधी आणि शेतीशी संबंधित इतर योजना देशातील करोडो शेतकर्‍यांना नवीन बळ देत आहेत”.

या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना वर्षभरात 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये एकूण 6,000 रुपये देण्यात येतात. या योजनेंतर्गत पहिला हप्ता हा 1 एप्रिल ते 31 जुलै, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर या कालावधीत दिला जातो.

त्याचबारोबर सरकार 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान तिसऱ्या हप्त्यासाठी पैसे हस्तांतरित करणार आहे. त्यामुळे पीएम किसानचा 13 वा हप्ता पुढील महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे.

ई-केवायसी अनिवार्य

या योजनेचे नियम सरकारने बदलली आहेत. नियमानुसार आता लाभार्थ्यांची खाती KYC शी लिंक करणे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही केवायसी केले नाही त्यांच्या खात्यात बाराव्या हप्त्याचे पैसे आलेले नाहीत. जर तुम्ही तुमचे ई-केवायसी केले नसेल, तर ते लवकर करा, नाहीतर तुम्हालाही 13व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

असे करा ई-केवायसी

  • सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट http://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाइटच्या उजव्या बाजूला असलेल्या e-KYC च्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तेथे तुमचा आधार क्रमांक टाका.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाका.
  • सगळ्यात शेवट ‘सबमिट’ वर क्लिक करा.

केंद्र सरकारने 13व्या हप्त्याचे नियम खूप कडक केले आहेत. त्यामुळे तुम्ही अजूनही ई-केवायसी केली नसेल किंवा खोटी माहिती दिली असेल तर सावध व्हा. कारण या शेतकऱ्यांवर सरकार कारवाई करत आहे.