अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-देशात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडतर्फे एक नामी संधी चालून आली आहे. BHEL तर्फे एकूण 60 जणांना तांत्रिक विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीवर घेतले जाणार आहे.
किती जागेंवर भरती :- भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडतर्फे विविध विभागात 60 शिकाऊ उमेदवारांना भरती करण्यात येत आहे. मेकॅनिकल, ईईई, ईसीई, सिव्हील और कॉम्यूटर इंजीनियरिंग या विभागांत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
अर्ज कसा करावा? :- उमेदवाराला सर्वप्रथम bharatplacement.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागेल. त्यांनतर हा फॉर्म भरून लागणारी सर्व कागदपत्रं या फॉर्मसोबत जोडून पूर्ण अर्ज dks@bhel.in या मेलवर पाठवावा लागेल.
मेल पाठवताना ‘The DY Manager, HRDC, BHEL, Ranipet PO & DT Pin code 632406’ हा पत्ता टाकणे आवश्यक आहे.