अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- विक्रेत्यांना आता ॲमेझॉन डॉट इन बाजारपेठेमध्ये आपले नाव नोंदविण्याचे आणि आपला ऑनलाइन बिझनेस सांभाळण्याचे काम मराठीतून करता येईल, अशी घोषणा ॲमेझॉनने रविवारी केली.
विक्रेता नोंदणी अर्थात सेलर रजिस्ट्रेशन आणि अकाऊंट मॅनेजमेंट सेवा मराठीमध्ये उपलब्ध झाल्याने ८५,००० हून अधिक विद्यमान ॲमेझॉन सेलर्स आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, जळगाव यांसारख्या टियर-१ व त्याखालील श्रेणींमधील शहरांतील लाखो नव्या विक्रेत्यांना फायदा होणार आहे. हा अनुभव ॲमेझॉन सेलर वेबसाइट तसेच मोबाइल ॲपवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याखेरीज ॲमेझॉनकडून सेलर सपोर्ट सेवा आणि सेलर युनिव्हर्सिटी व्हिडिओज व ट्यूटोरियल्ससुद्धा मराठीतून पुरवली जाणार आहेत. ॲमेझॉनच्या एमएसएमई अँड सेलर पार्टनर एक्स्पीरियन्स विभागाचे डायरेक्टर प्रणव भसीन म्हणाले की , भारतीय एमएसएमईंना आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी ई-कॉमर्सचा फायदा घेताना जाणवणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे भाषा.
अधिकाधिक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना ई-कॉमर्सच्या क्षेत्रात येण्यासाठी सक्षम बनविताना आम्ही आमच्या स्थानिक भाषांतील, व्हॉइस आणि व्हिडिओजचे पाठबळ असलेल्या उपक्रमांना अधिक भक्कम बनविण्यासाठी बांधिल आहोत. २०२५ पर्यंत १ कोटी एमएमएमईंना डिजिटाइझ करण्याच्या आमच्या प्रतिज्ञेबरहुकुम उचलले गेले आहे.
ॲमेझॉन सेलर्स आता ॲमेझॉन सेलर वेबसाइट आणि सेलर मोबाइल ॲपवरील काही मोजक्या सोप्या स्टेप्स वापरून आपली प्रीफर्ड लँग्वेज किंवा पसंतीची भाषा बदलू शकतात.