BGMI : खुशखबर! नवीन वर्षात परत येणार बीजीएमआय, ‘या’ दिवशी होणार लाँच

BGMI : काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने Google आणि Apple ला BGMI गेम Play Store वरून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे देशात आता बीजीएमआय ही गेम डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही. सरकारच्या या आदेशामुळे युजर्स कमालीचे निराश झाले आहेत.

अशातच आता यूजर्ससाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण देशात नवीन वर्षात म्हणजे 15 जानेवारी रोजी पुन्हा लाँच होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परतणार Google Play Store आणि App Store वर BGMI

BGMI लवकरच जानेवारी 2023 मध्ये Google Play Store आणि App Store वर परत येईल.बंदी झाल्यानंतर लगेचच, क्रॅफ्टनने आपल्या वापरकर्त्यांना असे आश्वासन दिले की ते भारतात परत येण्यासाठी सरकारसोबत चर्चा करत आहेत. त्यानंतर बीजीएमआयवर बंदी घालण्याबाबत कोणतेही अधिकृत विधान दिसून आले नाही.

15 जानेवारीला होणार लाँच

एएफकेगेमिंग प्रतीक “अल्फाक्लाशर” जोगिया आणि सोहेल “हेक्टर” शेख यांनी असा दावा केला आहे की बीजीएमआय लवकरच Android वर परत येईल. नुकत्याच झालेल्या लाइव्ह स्ट्रीममध्ये अल्फा क्लॅशरमध्ये प्रीडेटोरसुके नावाचा दुसरा खेळाडू सामील झाला होता.

ज्याने Google वर काम करत असल्याचा दावा केला होता.”देशात 15 जानेवारी रोजी BGMI गुगल प्ले स्टोअरवर लॉन्च होईल; ही तात्पुरती तारीख आहे. या वेबकास्टनंतर, हेक्टरला BGMI च्या परत येण्याबाबत विचारण्यात आले.