खुशखबर ! मलहापालिकेच्या ‘या’ तलावात सुरु होणार ‘बोटिंग’

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  नगर शहरापासून जवळच असलेला महापालिकेच्या पिंपळगाव माळवी येथे नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बसविण्यात येणार असून, तलावात बोटिंग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या ठिकाणी फिरायला येणाऱ्यांसाठी सुट्टीच्या आनंदाची मज्जा द्विगुणित होणार आहे.

दरम्यान येथे सुरु करण्यात येणाऱ्या बोटिंगसाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे महापौर रोहिणी शेंडगे यांनी सांगितले. महापौर रोहिणी शेंडगे यांनी पिंपळगाव माळवी तलावाला भेट देऊन जलपूजन केले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान याबाबत अधिक बोलताना महापौर शेंडगे म्हणाल्या कि, महानगरपालिकेचा पिंपळगाव माळवी तलाव नगर शहरापासून जवळच आहे. नागरिक सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी येत असतात. नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बसविण्यात येतील.

काही ठिकाणी विद्युत व्यवस्था देखील करण्यात येईल. तलावाच्या चारही बाजूने लोखंडी माहिती फलक बसविण्यात येणार आहेत. याप्रसंगी यावेळी सेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संतोष गेणाप्पा,

पिंपळगाव माळवीच्या सरपंच राधिका प्रभुणे, उपसरपंच भारती बनकर, उद्योजक सुभाष झिने, शशिकांत गायकवाड, बापू बेरड, सतीश बनकर, संजय प्रभुणे, किशोर कानडे, श्रेयश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office