अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- देशातील पहिल्या अँटीव्हायरल औषधाचा शोध केंद्रीय औषध संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकाने लावला आहे. ‘उमिफेनोविर’ असे या औषधाचे नाव आहे.
या औषधामुळे कोरोना रुग्ण केवळ पाच दिवसात बरे होणार असल्याचा दावा सीडीआरआयने केला आहे. सीडीआरआयचे संचालक तपस कुंडू म्हणाले, 18 ते 75 वयोगटातील 132 कोरोना रुग्णांवर तीन टप्प्यात ‘उमिफेनोविर’ औषधाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.
यामध्ये विना लक्षणे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरले आहे. डेल्टा व्हेरिएंटविरोधातही हे औषध परिणामकारक ठरेल, अशी आशा आहे. रुग्ण बरे होण्यासाठी उमिफेनोविर 800 एमजीचा डोस दिवसातून दोन वेळा असा पाच दिवस घ्यावा लागेल.
कोरोनाच्या उपचारात उमिफेनोविर गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठीही सुरक्षित आहे. लवकरच उमिफेनोविर टॅबलेट आणि सिरपच्या रुपाने बाजारात येऊ शकते. त्याची किंमतही माफफ असेल, असेही त्यांनी सांगितले. कोरोना महामारी आल्यानंतर संस्थेच्या 16 सदस्यांनी हे औषध प्रायोगिक तत्त्वावर कोरोना रुग्णांना देण्याची मागणी केली.
3 पातळ्यांवर हा प्रयोग झाला, ज्यात कमी लक्षणं असणाऱ्या आणि लक्षणं नसणाऱ्या कोरोना रुग्णांवर उमिफेनोविर प्रभावी ठरल असल्याचं दिसलं. या औषधाने कोरोनाचा रुग्णांवरील प्रभाव जवळपास संपुष्टात आणला. या औषधाचा 800MG चा डोस रुग्णांना 5 दिवसांत सकाळी आणि संध्याकाळी देण्यात आला.
त्यानंतर हे औषध प्रभावी असल्याचं शास्रज्ञांना कळालं. शास्रज्ञांच्या दाव्यानुसार, उमिफेनोविर हे औषध कोरोना रुग्णांना लवकर बरं करण्यास मदत करतं. या औषधाचे परिणाम लगेच दिसायला लागतात. उमिफेनोविरचा प्रयोग करताना 18 ते 75 वर्षांदरम्यानच्या रुग्णांचा व्हॉलंटीअऱ म्हणून वापर करण्यात आला.
गोव्याच्या मेडिजेस्ट मेसर्स या कंपनीने हे औषध बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. लवकरच हे औषध गोळ्या आणि सिरपच्या स्वरुपात बाजारात येण्याची शक्यता आहे. उमिफेनोविरची किंमत ही ग्राहकांना परवडेल अशीच असणार आहे. हे औषध लहान मुलांसाठीही सुरक्षित असल्याचा दावा CDRI च्या शास्रज्ञांनी केला आहे.
शास्रज्ञांच्या मते हे औषध गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी सुरक्षित आहे. उमिफेनोवीर हा कोरोनाच्या सेल्स कल्चरला प्रभावीपणे नष्ट करतो. शिवाय, मानवी कोषिकांमध्ये कोरोनाचा होणारा प्रवेशही हे औषध रोखतं. 5 दिवसांच्या उमिफेनोविर या औषधाचा खर्च 600 रुपयांपर्यंत येऊ शकतो.