अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतलीय. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुकडी प्रकल्पातून नियोजनानुसार गेल्या आठवड्यातच पाणी सोडण्यात येणार होते. मात्र जुन्नर तालुक्यातील शेतकरी प्रशांत औटी यांनी याविरोधात याचिका दाखल केली.
त्यावर कुकडी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन बंद करावे, असा स्थगिती आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर दिलेली स्थगिती उठवावी, या मागणीसाठी नगर जिल्ह्यातून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, अशी हस्तक्षेप याचिका श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी मारुती भापकर यांनी अॅड असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दि. 7 मे रोजी कुकडीचे आवर्तन सोडण्यावर स्थगिती दिली.
दि 12 मे ला सुनावणी ठेवली. दि 11 ला आ. बबनराव पाचपुते, आ. रोहीत पवार, आ. अतुल बेनके यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन प्रशांत औटी यांनी याचिका मागे घ्यावी म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विनंती केली केली.
त्यावर राहुल जगताप घनश्याम शेलार, आण्णासाहेब शेलार, मारुती भापकर, बाळासाहेब नाहाटा, राजेंद्र म्हस्के, अनुराधा नागवडे, विलास काकडे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या. परंतु प्रशांत औटी यांनी दुसऱ्या दिवशी न्यायालयात यू टर्न मारला.
न्यायालयाने पुन्हा 17 मे ला सुनावणी ठेवली. त्यावर आ. रोहीत पवार, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, आण्णासाहेब शेलार
यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली आणि पुन्हा प्रशांत औटीची मनधरणी केली. अखेर प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतली. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला.