Google Chrome : खुशखबर! गुगल क्रोममध्येही असणार फिंगरप्रिंट लॉक, असे करा चालू

गुगलने आपल्या वापरकर्त्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण आता गुगल क्रोममध्येही फिंगरप्रिंट लॉक इन्स्टॉल करता येणार आहे.

Google Chrome : जर काही शोधायचे असेल तर आपण लगेच गुगलचा वापर करतो. यावर एका मिनिटात कितीतरी माहिती येते. दरम्यान गुगल आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन आणि जबरदस्त फीचर्स आणत असते. तसेच गुगल वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठीही काही फीचर्स आणत असते.

असेच एक फिचर गुगलने आणले आहे. या नवीन फीचरमुळे वापरकर्त्यांना फिंगरप्रिंट लॉक इन्स्टॉल करता येईल. त्यामुळे वापरकर्त्यांचे क्रोम ब्राउझर सुरक्षित राहील. हे लक्षात घ्या की हे नवीन फिचर फक्त Android फोन आणि टॅबलेट वापरकर्त्यांसाठी असणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुगल क्रोमचे हे नवीन फिंगरप्रिंट लॉक फीचर Incognito Mode साठी जारी केले असून ते एक खाजगी मोड आहे. सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की नवीन फीचर केवळ Android फोन आणि टॅबलेट वापरकर्त्यांना वापरता येईल. हे फीचर सुरू केल्यानंतर, अॅपमधून बाहेर येताच Incognito Mode लॉक होईल.

यानंतर जर वापरकर्त्यांना ब्राउझर उघडायचे असेल तर त्यांना फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करावा लागणार आहे. ज्या प्रकारे व्हॉट्सअॅपचे फिंगरप्रिंट लॉक फीचर काम करते त्याच प्रकारे हे फीचर काम करेल. 2021 मध्ये सर्वात अगोदर बायोमेट्रिक लॉक फीचर iOS डिव्हाइसेसवर Incognito Mode साठी रिलीज केले होते.

गुगलकडून एका ब्लॉगद्वारे या फीचरची माहिती देण्यात आली आहे. गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, जर वापरकर्त्यांना Incognito टॅब पुन्हा उघडायचा असेल तर वापरकर्त्यांना बायोमेट्रिक लॉकचा वापर करावा लागणार आहे. हे देखील लक्षात घ्या की, आता फक्त ज्या व्यक्तीचा फोन आहे तोच हा मोड उघडू शकतो.

जर तुम्हाला हे फीचर चालू करायचे असेल तर ते गुगल क्रोमच्या सेटिंगमध्ये जाऊन फीचर चालू करू शकता. सेटिंगमध्ये गेल्यानंतर, तुम्हाला गोपनीयता आणि सुरक्षिततेमध्ये लॉक इनकॉग्निटो टॅब सक्षम करण्याचा पर्याय मिळेल. हे फीचर ऑन केले तर तुम्हाला ते अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंट, फेस आयडी, पॅटर्न किंवा पिन वापरावा लागणार आहे.