BGMI Unban Update : BGMI चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच परत येऊ शकतो गेम, सरकार केव्हा काढणार यावरील बंदी जाणून घ्या येथे…

BGMI Unban Update : लोकप्रिय भारतीय मोबाइल बॅटल रॉयल गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India) किंवा BGMI लवकरच पुनरागमन करू शकते. भारत सरकार (Government of India) लवकरच यावरील बंदी हटवू शकते. एका अहवालानुसार, या वर्षाच्या अखेरीस हा गेम परत येण्याची शक्यता आहे.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया किंवा बीजीएमआयच्या (BGMI) रिटर्नबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. क्राफ्टनची (Crafton) या योजनेत काही BGMI खेळाडूंना त्यात प्रवेश आहे. परंतु, त्यांना अपडेटबद्दल माहिती नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यूट्यूबवर बीजीएमआय प्लेअर सपोर्ट चॅनल सुरू केले –

जेव्हा क्राफ्टनने यूट्यूब (YouTube) वर नवीन BGMI प्लेयर सपोर्ट चॅनेल सुरू केले तेव्हा त्याच्या परताव्याची चर्चा सुरू झाली. याशिवाय कंपनीच्या वेबसाइटवरही अनेक व्हिडिओ (video) अपलोड करण्यात आले होते. या अपडेटनंतर चाहते आणि खेळाडू खूप खूश आहेत.

Krafton PUBG आणि BGMI चे अधिकृत प्रकाशक आहे. याआधी भारतात चिनी कनेक्शनमुळे PUBG मोबाईलवर बंदी घालण्यात आली होती. पण, कंपनीने विशेषतः भारतातील खेळाडूंसाठी BGMI लाँच केले.

या खेळाला खूप प्रसिद्धीही मिळाली. परंतु, कंपनीला दुसऱ्या देशात डेटा पाठवल्याबद्दल ब्लॉक करण्यात आले. ते गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि Apple App Store वरून काढून टाकण्यात आले. परंतु, आता नवीन अहवालावरून असे दिसते आहे की ते लवकरच पुनरागमन करू शकते.

तेव्हापासून ते परत आणण्यासाठी क्राफ्टन सतत प्रयत्न करत आहे. आता यूट्यूबवर चार व्हिडिओ प्रकाशित झाले आहेत. यामध्ये, वारंवार विचारले जाणारे बहुतेक प्रश्न सांगितले गेले आहेत. मात्र, यूट्यूब व्हिडिओ अद्याप प्रकाशित झालेला नाही. पण, हे व्हिडिओ कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.