अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील अनेक रस्त्यांची मोठी चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यांवर तात्पूरत्या पॅचिंगचे काम सुरू आहे. लवकरच खडीकरण व डांबरीकरण करून सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहेत.

दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव शासनाकडून लवकरच मंजूर होणार असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.

अहमदनगर शहरातील सर्वच अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केलेला असून या साठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून पाठपुरावा केला जात आहे.

लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळून टप्प्या टप्प्याने निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली. शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली असून

हे खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना आ. संग्राम जगताप यांनी मंगळवारी (दि.14) महापालिका आयुक्त, उपायुक्त

तसेच संबंधित अधिकारी यांची बैठक बोलावून केली होती. त्यानुसार गुरुवारी (दि.16) सकाळ पासून महापालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे.