Government Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार देत आहे घरबसल्या लाखो कमावण्याची संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme : देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना लाखो रुपये कमावण्याची संधी देत आहे.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांना घरी बसूनच पैसे कमावता येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचे नाव ‘सोलर पंप योजना’ असे आहे.

सरकार सौरऊर्जेच्या वापरासाठी मोठी पावले उचलत असून सरकार अनेक योजना राबवत आहे.अनेकांना याबाबत माहिती नसते. माहितीच्या अभावामुळे लोक या योजनांचा लाभ घेता येत नाही.

सौरपंप बसवून शेतकरी सिंचन करून पैसेही कमवू शकतात. यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल. त्यामुळे वीज आणि डिझेलसह सिंचनाच्या खर्चातही मोठा दिलासा मिळेल.

असा करा अर्ज

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत तुम्हाला 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. तसेच सरकार या अनुदानाच्या रकमेवर पंचायती आणि समित्यांना सौरपंपही उपलब्ध करून देते. शेतकऱ्यांना योजनेंतर्गत 30 टक्के रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. त्यामुळे सोलर पंपासाठी फक्त 10 टक्के रक्कम जमा करून अर्ज करावा लागेल.

या योजनचा लाभ घेण्यासाठी तुम्ही http://pmkusum.mnre.gov.in ला भेट देऊ शकता. तसेच 1800-180-3333  या टोल फ्री क्रमांकावर जाऊन तुम्ही इतर माहिती मिळवू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्ही जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

असे कमवा पैसे

या योजनेअंतर्गत तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत वीज निर्माण करू शकता. विभाग 3 रुपये 7 पैसे दराने उत्पादित वीज खरेदी करेल. त्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक 4 ते 5 लाखांचे उत्पन्न मिळू शकते. त्याचप्रमाणे वीज विक्रीवर दरवर्षी एकरी 60 हजार ते 1 लाख रुपये मिळतील. हे लक्षात घ्या की, या योजनेंतर्गत 25 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळवता येते.