ताज्या बातम्या

PMKMY : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार इतके हजार रुपये, लवकरात लवकर करा अर्ज

Published by
Ahmednagarlive24 Office

PMKMY : केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे.

कारण सरकार आता शेतकऱ्यांना महिन्याला पैसे देणार आहे. पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना महिन्याला 3 हजार रुपये मिळणार आहेत.

पेन्शनसाठी आवश्यक अटी

मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेत नाव असणे आवश्यक आहे. तुमच्या खात्यात 2,000 रुपये हप्त्याची रक्कम आली तरच तुम्हाला दरमहा पेन्शनचा लाभ मिळेल. यासाठी आधी थोडी गुंतवणूक करावी लागेल. योजनेत सामील होण्यासाठी तुमचे किमान वय 18 आणि कमाल चाळीस वर्षे असावे.

त्यानंतर 60 वर्षांनंतर तुम्हाला प्रत्येक हिनाला 3,000 रुपये पेन्शनचा लाभ दिला जाईल. इतकेच नाही तर दरमहा 3,000 रुपये वार्षिक 36,000 रुपये पेन्शन म्हणून मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आधी त्यात नोंदणी करावी लागेल.

खूप गुंतवणूक करा

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत दरमहा 3 हजार रुपये पेन्शनचा लाभ दिला जातो. या योजनेचा प्रीमियम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेतून कापला जातो. मात्र यासाठी तुम्हाला स्वतंत्र फॉर्म भरावा लागेल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेतूनच गुंतवणूक करण्याची गरज आहे. ही रक्कम 55 ते 200 रुपयांच्या दरम्यान असते. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, प्रीमियमची रक्कम कापून घेणे थांबते आणि दरमहा 3,000 रुपये पेन्शन सुरू होते.

Ahmednagarlive24 Office