अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- निळवंडे धरणातून गुरुवारी दीड हजार क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन सुमारे 28 ते 30 दिवस सुरू राहणार असून यात साडेतीन टीएमसी पाणी खर्च होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना दिलासा ; बंधारे भरण्यात येणार :- भंडारदरा आणि निळवंडे धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी लाभक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात मागणी होती.
त्यानुसार अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर ते नेवाशापर्यंत असलेले बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यानंतर याला जोडूनच उन्हाळ हंगामातील शेतीचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे.
हे आवर्तन सुमारे 28 ते 30 दिवस सुरू राहणार आहे. पाणी सोडतेवेळी निळवंडेत 5879 दलघफू पाणीसाठा होता. भंडारदरा धरणात 8820 दलघफू पाणीसाठा आहे.