शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राहुरीत हरभरा खरेदी केंद्र होणार सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्हा मार्केटिंग फेडरशनच्या वतीने राहुरी येथील तालुका खरेदी विक्री संघ येथे हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

शासनाने हरभऱ्यासाठी ५१०० रूपये क्विंटल भाव जाहीर केलेला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष युवराज तनपुरे यांनी दिली.

पत्रकात तनपुरे यांनी म्हटले, की केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी विक्री संघ येथे हरभरा खरेदी केंद्र १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरु करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपली नावनोंदणी संघाच्या कार्यालयात करावी. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र नोंदणीसाठी आधार कार्ड, सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पिकांची नोंद असलेला उतारा,

आधार कार्डशी सलग्न असलेले बॅंक पासबुक, कार्यरत असलेला मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. नावनोंदणी करताना शेतकऱ्याने स्वत: उपस्थित राहाणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बँक खाते देताना जनधन खाते स्वीकारले जाणार नाही. खाते आधारशी संलग्न असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, अन्यथा पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते.

नावनोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. नावनोंदणी राहुरी तालुका खरेदी विक्री संघ गाडगे आश्रम शाळेसमोर येथे होईल व शेतकऱ्यांच्या शेत मालाची प्रतवारी करून खरेदी मार्केट यार्ड वांबोरी आवार येथे करण्यात येईल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24