Indian Railways : नुकताच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी खूप मोठा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे आता विलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत. तसेच आता या अर्थसंकल्पानंतर रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीचा होणार आहे.
आता दररोज 12 किलोमीटरहून अधिक ट्रॅक टाकण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे आता रेल्वेच्या गाड्यांमध्ये वाढ होणार आहे. याचा रेल्वे प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे.
जाहीर झाला तब्बल 75,000 कोटी रुपयांचा निधी
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव असे म्हणाले की, “रेल्वेच्या नवीन योजनांसाठी अर्थसंकल्पात 75,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने रेल्वेसाठी 2.4 लाख कोटींचा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रेल्वेमध्ये गुंतवणुकीची जी कमतरता भासत होती, ती आता भरून निघणार आहे. या अर्थसंकल्पात हरित विकास, पर्यटन क्षेत्रावर भर दिला आहे. तसेच आता सेमी हायस्पीड गाड्यांची संख्या वाढणार असून रेल्वे लाईन टाकण्याचे काम लवकर सुरू आहे.
सुरु आहे 183 नवीन लाईनचे काम
सध्या रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी 183 नवीन मार्गांवर काम सुरू आहे. अनेक ठिकाणी तर सिंगल लाईनचे दुहेरीकरण आणि अनेक ठिकाणी गेज परिवर्तन केले आहे. त्यामुळे आता आणखी प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास सोयीस्कर होणार आहे. पहिल्या दिवशी फक्त 4 किमी ट्रॅक टाकण्याचे काम झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु,आता दररोज 12 किलोमीटरहून अधिक ट्रॅक टाकण्याचे काम केले जाणार आहे.
देशभरात सुमारे 49,323 किमी लांबीच्या 452 प्रकल्पांवर काम सुरू असून अंदाजानुसार त्यांची किंमत 7.33 लाख कोटी इतकी आहे. यातील काही योजना सुरू आहेत, काही मंजूर झाल्या असून तर त्यापैकी काही प्रगतीपथावर आहेत. तसेच 183 नवीन रेल्वे लाईन बांधण्यात येत आहेत. गेज रूपांतरण 42 लाईनवर आणि 227 लाईनचे दुहेरीकरण केले जात आहे.
माहितीनुसार मध्य रेल्वे-14, पूर्व रेल्वे-12, पूर्व किनारपट्टी रेल्वे- 8, पूर्व मध्य रेल्वे-25, उत्तर मध्य रेल्वे- 1, ईशान्य रेल्वे-10, ईशान्य फ्रंटियर रेल्वे- 20, उत्तर रेल्वे- 18, उत्तर पश्चिम रेल्वे – 8, दक्षिण मध्य रेल्वे – 15, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे – 9, दक्षिण पूर्व – 7, दक्षिण रेल्वे – 11, दक्षिण पश्चिम रेल्वे – 18, पश्चिम मध्य रेल्वे – 3 आणि पश्चिम रेल्वे – 4 मार्ग.