Budget 2023 : केंद्र सरकारकडून लवकरच देशाचा २०२३ या नवीन वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाऊ शकतो. यामध्ये देशातील शेतकरी आणि कर्मचारी वर्गासाठी मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच या अर्थसंकल्पाची अनेकजण वाट पाहत आहेत.
केंद्र सरकार २०२३ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याची तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी २०१८ मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे.
या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हफ्त्यांमध्ये जमा केली जाते. येणाया अर्थसंकल्पात केंद्र सरकार ही रक्कम वाढवण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करू शकतात. त्यामुळे जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना या वाढीव रकमेचा फायदा होणार आहे. तसेच अजून शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
आता या योजनेची रक्कम शेतकऱ्यांना चार हफ्त्यांमध्ये मिळू शकते. केंद्र सरकारकडून रक्कम वाढवली गेली तर ती शेतकऱ्यांना वर्षातून ४ हफ्त्यांमध्ये मिळू शकते.
बियाणे, खाते आणि शेतीउपयुक्त वस्तू दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पत यासाठी काही निर्णय घेतला जातो का? याकडे शेतकरी आस लावून पाहत आहेत.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत. १३ वा हफ्ता लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नवीन वर्ष सुरु होऊन २ आठवडे झाले आहेत मात्र अद्याप रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही.
१४ जानेवारीला केंद्र सरकार शेतकऱ्यांना १३ व्या हफ्त्याची रक्कम जमा करून आनंदाची बातमी देऊ शकते. शेवटचा हफ्ता 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता.