अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- पबजी चाहत्यांसाठी एक खुशखबरी आहे. नव्या अपडेटनुसार, पबजी यावर्षी सप्टेंबरमध्ये न्यू स्टेट रिलीज करणार आहे. यासाठी कंपनी जोरात कार्यरत आहे. यापूर्वी, पबजीने अधिकृतपणे घोषणा केली की आयओएस डिव्हाइससाठी पूर्व-नोंदणी ऑगस्ट महिन्यात सुरू होईल.
क्राफ्टनने पबजी गेम विकसित करून जगभरात यश संपादन केले आहे. बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया, पबजी मोबाइलची भारतीय आवृत्ती, याला गेम प्रेमींकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी, क्राफ्टनने 25 फेब्रुवारी 2021 रोजी Android डिव्हाइसवर टाइटलसाठी प्री-रजिस्ट्रेशन ओपन केल्या होत्या. भारत, चीन आणि व्हिएतनाम वगळता प्री- रजिस्ट्रेशन अद्याप उघडलेली नाही. या गेमला जगभरातून 20 मिलियन प्री-रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आहे.
5 स्टुडिओ बनवण्याची योजना आहे – पब्जी न्यू स्टेट लॉन्च करण्याशिवाय, क्राफ्टनची जगभरात 5 स्टुडिओ आणि 17 शाखा तयार करण्याची योजना आहे. क्राफ्टनचे मुख्य कार्यकारी अधिकारी किम चांग-हान यांच्यानुसार कंपनीची उत्तर अमेरिका, भारत,
दक्षिणपूर्व आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिका यासारख्या प्रदेशांमध्ये विस्तार करण्याची योजना आहे. सप्टेंबरमध्ये पबजी न्यू स्टेट रिलीजची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत जेणेकरून ते खेळाचा पूर्ण आनंद घेऊ शकतील.