Ration Card : आजही आपल्या देशात दारिद्र्यरेषेच्या खाली असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांद्वारे सतत वेगवेगळ्या फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सरकारकडून या योजनांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात.
अशातच आता या दरम्यान देशातील कोट्यवधी रेशनकार्डधारकांना मोफत रेशनसोबतच केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष सुविधा देण्यात येणार आहे. जर तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर तुम्हालाही सरकारकडून आणखी एक विशेष लाभ देण्यात येणार आहे. काय आहे सरकारची ही विशेष सुविधा जाणून घ्या.
हे पण वाचा :- गुढीपाडव्याला मिळणारा आनंदाचा शिधा नेमका कधी वितरित होणार? वाचा याविषयी सविस्तर
रेशनकार्डधारकांना सरकारने आता रेशनसह काही पैसे देण्याची घोषणा केली आहे. गहू, तांदळासह रेशनकार्डधारकांना एक हजार रुपये देण्यात येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तसेच मोफत रेशन सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कधी झाली घोषणा
सध्या गहू आणि तांदळासह सरकारने जाहीर केलेल्या 1000 रुपयांची चर्चा जोरात सुरू आहे. परंतु, त्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे. सर्व प्रथम, तुम्ही तामिळनाडूचे रहिवासी असावे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ही घोषणा केली असून ज्याची चर्चा जोरात सुरू आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! अर्धा एकरात ‘या’ फळपिकाची शेती सुरु केली, अन मिळवलं तब्बल 11 लाखांचं…
परंतु, हे पैसे फक्त महिला शिधापत्रिकाधारकांना देणे शक्य असल्याचे मानले जात असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक मंचावरून ही घोषणा केली होती. राज्य सरकारने एक हजार रुपये देण्याची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी 3 जूनपासून केली जाणार आहे.
कोणाला होणार फायदा
35 किलो तांदूळ खरेदी करणाऱ्यांना आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. तर कुटुंब कार्डधारक महिलांसाठी PHAAY उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हरियाणा सरकारकडून बीपीएल शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय कार्डधारकांना दोन लिटर मोहरीच्या तेलाचा लाभ मोफत देण्यात येणार आहे. राज्यातील जनतेला यापूर्वी सरकारकडून 250 रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. त्यात बदल करून आता 300 रुपये इतकी करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- राज्यातील आमदारांना किती पगार मिळतो ? वाचा सर्व माहिती एकाच क्लिकवर