साईभक्तांसाठी खुशखबर ! भाविकांच्या सुविधासाठी विशेष रेल्वे गाडी सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार दोन नवीन रेल्वे पुन्हा सुरू होणार आहे. कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर आणि तिरुपती-श्री साईनगर शिर्डी-तिरुपती या गाड्या नांदेड रेल्वे विभागातून धावणार आहेत.

रेल्वे क्रमांक ०७४१७ तिरुपती-श्री साई नगर शिर्डी (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी धावणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या आणि साई भाविकांच्या सुविधासाठी विशेष गाडी सुरू करण्याचा हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान पुढील महिन्यात म्हणजेच शनिवार ६ एप्रिलपासून तिरूपती-साईनगर शिर्डी- तिरूपती विशेष साप्ताहिक एक्सप्रेस पुढील आदेश येईपर्यत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, या गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असणार असून ज्या प्रवाशांकडे कन्फर्म आरक्षण तिकीट असतील त्यांनाच प्रवास करता येणार आहे. या गाडीचे आरक्षण ७ मार्चपासून सुरू होणार आहे.

नवीन सुरू होणाऱ्या गाड्या :-

  • 1) गाडी संख्या ०७४१७ तिरुपती-श्री साई नगर शिर्डी (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी : हि गाडी दिनांक ६ एप्रिल पासून तिरुपती येथून दर मंगळवारी सकाळी ०८.३० वाजता सुटेल आणि गुंटकळ, सिकंदराबाद, निझामाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे श्री साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता पोहोचतील.
  • 2) गाडी संख्या ०७४१८ श्री साईनगर शिर्डी – तिरुपती- (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दर बुधवारी : हि गाडी दिनांक ७ एप्रिल पासून श्री साईनगर शिर्डी येथून दर बुधवारी रात्री ०७ .३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, नांदेड, निझामाबाद, सिकंदराबाद, गुंटकळ मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.10 वाजता तिरुपती येथे पोहोचतील.
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
  • p
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24