ताज्या बातम्या

Hero Electric : स्कुटरप्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच मार्केटमध्ये लॉन्च होणार Hero ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

Published by
Ahmednagarlive24 Office

Hero Electric : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत. ग्राहकांची मागणी पाहता आता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहेत. अशातच आता भारतातील दिग्ग्ज कंपनी हीरो आपली नवीन इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

कंपनी यात शानदार फीचर्स देणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने या स्कुटरचा टीझर शेअर केला आहे. परंतु, जर तुम्हाला ही स्कुटर खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण ही स्कुटर कोणत्या दिवशी लाँच होणार हे अद्याप समजले नाही.

कंपनीने रिलीज केला टीझर

हिरो इलेक्ट्रिकने आज एक टीझर रिलीज केला असून ज्यात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर दाखवण्यात आली आहे. लवकरच कंपनीकडून ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाण्याची अपेक्षा केली जात आहे.

कसे आहे डिझाइन? जाणून घ्या

टीझरमध्ये स्कूटरबद्दल जास्त माहिती मिळाली नाही परंतु समोरच्या काऊलवर एलईडी हेडलॅम्प दिला आहे. दरम्यान टर्न इंडिकेटरही देण्यात आले आहे. तसेच, या स्कूटरमध्ये कर्व्ही सीट, फ्रंट डिस्क ब्रेक, ग्रॅब रेल, साइड मिरर, अलॉय व्हील तसेच निळ्या रंगाची पेंट स्कीम पाहता येते.

कधी होणार लॉन्च?

लॉन्चबाबत कंपनीकडून अजूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्यातच ही स्कूटर लॉन्च केली जाऊ शकते. ही स्कूटर 15 मार्चच्या आसपास लॉन्च होऊ शकते.

किती येणार खर्च?

सध्या कंपनीकडून या स्कूटरचा एक टीझर रिलीज केला आहे. परंतु लॉन्च तारीख आणि किंमतीशी निगडित इतर कोणतीही माहिती दिली नाही. पण त्याची एक्स-शोरूम किंमत 80 ते 90 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

कसा आहे पोर्टफोलिओ?

भारतीय बाजारपेठेत कंपनी सध्या Hero AD, इलेक्ट्रिक फोटॉन LP, Optima CX-Dual Battery, Optima CX-Single Battery, NYX HS500 ER, Atria LX सारखी इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत आहे. यात, ऑप्टिमा स्कूटर फ्लॅगशिप स्कूटर म्हणून ऑफर केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office